ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये .ॲड प्रकाश आंबेडकर

जालना:- दि.२० जून –बाळासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीला मान देऊन ओबीसी आंदोलकांनी लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी पाणी पिले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी वडीगोद्री येथे गेल्या आठ दिवसांपासून ओबीसी आरक्षण बचावच्या मागणीसाठी प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांची उपोषणस्थळी भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी बोलतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीला मान देऊन ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी पाणी पिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!